महिला पोलीस कर्मचार्याला पोलीस ठाण्यातील रायफल चोरीच्या प्रकरणी अटक
असे ‘चोरटे’ पोलीस समाजात होणार्या चोर्या काय रोखणार ?
चूरू (राजस्थान) – येथील महिला पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई लिलावती हिने ठाणे अंमलदार आणि अन्य पोलीस कर्मचारी यांना धडा शिकवण्यासाठी पोलीस ठाण्यातील ‘इसांस रायफल’ चोरली. नंतर ही रायफल चूरू न्यायालयातील प्रकाश नावाच्या एका लिपिकाच्या घरात सापडली. पोलिसांनी लिलावती आणि प्रकाश या दोघांना अटक केली आहे.