पुणे जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार करणार्याला अटक
जनतेला लुटणार्या अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
सासवड – दिवे येथील सरकारी धान्य गोदामातून सासवड येथील दुकानात नेण्यासाठी घेतलेला माल सासवडऐवजी जेजुरीकडे नेणार्या ट्रक चालकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. बाळू मदने असे ट्रकचालकाचे नाव असून त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीकडून २०० पोती गहू आणि तांदूळ असा ३ लाख ९९ सहस्र ५०० रुपयांचा माल शासनाधीन करण्यात आला आहे. सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.