सोलापूर महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन !
सोलापूर, २८ मे (वार्ता.) – येथे महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती (दिनांकानुसार) निमित्त श्री मार्कंडेय उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला, तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेविका संगिता जाधव, माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे, रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, एस्.के. कुलकर्णी, राम तडवळकर, शशिकांत तुळजापूरकर, विवेक पवार, परिवहन सदस्य विजय पुकाळे, सुरेश लिंगराज, जयप्रकाश आमनगी आदी मान्यवर उपस्थित होते.