व्यावसायिक किशोर पटवर्धन यांच्याकडून वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयास एक सहस्रपेक्षा अधिक ‘इंजेक्शने’ प्रदान !
मिरज, २८ मे (वार्ता.) – येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री. किशोर पटवर्धन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयास कोरोनासाठी लागणारी आणि अन्य विविध आजारांसाठी लागणारी मात्र सध्या तुटवडा असणारी एक सहस्रपेक्षा अधिक ‘इंजेक्शने’ प्रदान केली. विविध औषधी आस्थापनांशी संपर्क साधून ही औषधे मागवण्यात आली. या वेळी श्री. किशोर पटवर्धन, भाजपचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख श्री. ओंकार शुक्ल, डॉ. शिंदे, डॉ. चौगुले, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका उपायुक्त सौ. स्मृती पाटील, सौ. इरावती पटवर्धन, ‘क्रीडाई’चे अध्यक्ष श्री. रवी खिलारे उपस्थित होते.