दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘ऑनलाईन’ २२ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील उपस्थित दर्शकांचे अभिप्राय !
१. कार्यक्रमाचे आयोजन फार चांगल्या रीतीने केलेे होते. श्री. सुनील घनवट यांनी त्यांची सगळी सूत्रे अतिशय परिणामकारकपणे मांडली. त्यांनी अन्य वृत्तपत्रांमध्ये न येणार्या खर्या बातम्या ‘सनातन प्रभात’मध्ये कशा दिल्या जातात ? हेही उदाहरणे देऊन सांगितले.’ – श्री. अनिरुद्ध जोशी, माजी जनरल मॅनेजर, सेसा गोवा आस्थापन, फोंडा, गोवा.
२. ‘हिंदूंमध्ये सत्य आणि परखडपणे जनजागृती करणारे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! खूप खूप शुभेच्छा !’ – श्री. शैल अक्कलकोटे
३. ‘आर्थिक हानी सोसून केवळ समाजाच्या उद्धारासाठी संतांच्या आशीर्वादाने आणि देवतांच्या कृपेने चालवण्यात येत असलेले, तसेच कोणातही मोबदला न घेता साधकांच्या अथक सेवेने गेली २२ वर्ष चालू असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ ! ही वाटचाल अशीच चालू राहू दे.’ – श्री. लक्ष्मण जठार
४. ‘सनातन प्रभात’, हे सामान्य मनुष्याला ‘साधना’ मार्गावर मार्गस्थ करण्यासाठीची पहिली पायरी होय. ‘सनातन प्रभात’कडून आपत्काळाविषयी मिळालेली समग्र माहिती केवळ अप्रतिम आणि मार्गदर्शक आहे. ‘सनातन प्रभात’चा वाचक म्हणून अत्यंत कृतकृत्य वाटत आहे. ‘सनातन प्रभात’चा प्रसार असाच वृद्धींगत होत राहो, ही सदिच्छा !’ – श्री. गिरीश ढवळीकर, रायगड
५. ‘सनातन प्रभात’सारखे आंतरराष्ट्रीय महामहीम कीर्तीचे दैनिक लाभणे, हे भारताचे आणि हिंदु धर्माचे परमभाग्यच आहे. – श्री. सजीत यमगर
६. हरि ॐ ! वैद्य दामले यांचा विषय संपूच नये, असे वाटले. उत्कृष्ट वक्तृत्व आणि अभ्यास… हरि ॐ ! प्रभु नमो नारायण !
७. दैनिक ‘सनातन प्रभात’, हे आम्हांसाठी नवसंजीवनी आहे. – सुलभा पाटील
८. दैनिकातून परखडता कशी असते ? हे समजते. दैनिक ‘सनातन प्रभात’ योग्य दिशादर्शक म्हणून कार्य करते. नावाप्रमाणेच यातील विचारही सनातन राहील, हेच ईश्वरी नियोजन असल्याचे दिसते. ‘सनातन प्रभात’मधून बौद्धिक, वैचारिक आणि आध्यात्मिक क्रांती घडवून आणली जात आहे. हाच ईश्वराचा आशीर्वाद असल्याचे जाणवते. – एक दर्शक
९. ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे, जे निर्भीडपणे विचार मांडते. – श्री. रघुवीर मडकईकर, पणजी, गोवा.
१०. हिंदूंच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करते. त्यामुळेच सनातन संस्था हिंदूंना आपली वाटते. सर्व हिंदूंनी ‘सनातन प्रभात’शी जोडले पाहिजे. – श्री. मनोहरलाल उनेचा
११. वैद्य दामले सर, आपण अत्यंत योग्य पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले आहे. ‘सनातन प्रभात’ दैनिकासाठी डॉ. जयंत (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! – शीतल स्वामी
दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे पत्रकारितेच्या चिखलातील पवित्र कमळ ! – डॉ. राजेंद्र गावस्कर, वेंगुर्ला, सिंधुदुर्गसात्त्विकतेचा स्रोत असलेल्या ‘सनातन प्रभात’ला विनम्र वंदन ! भारतीयच नव्हे, तर जागतिक स्तरावरील समाजाला साधनाप्रवण करण्यासाठी अविरत कार्यरत असलेले एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’, हे एक दिव्य आश्चर्यच आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे पत्रकारितेच्या चिखलातील पवित्र कमळ होय. आयुर्वेद आणि हिंदु परंपरा यांवर अतीव निष्ठा असणारे आणि कटाक्षपूर्वक स्वाचरणाचा आदर्श ठेवणारे वैद्य सुविनय दामले यांचे अभिनंदन अन् प्रणाम ! |
वाचकांचे अभिप्राय
१. हिंदु धर्माविषयी शास्त्रोक्त माहिती मिळते !
‘दैनिक ‘सनातन प्रभातमधून आम्हाला आमचे सण-उत्सव यांविषयी शास्त्रोक्त माहिती मिळते आणि त्याप्रमाणे आम्हाला सण साजरे करता येतात. ही माहिती पुष्कळ चांगली असते. आम्हाला अशी माहिती अन्य कुठेही वाचायला मिळत नाही. ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ‘अॅप’ही चांगले आहे. यात स्तोत्रे, मंत्र, जप आणि आरत्या चांगल्या, शांत आणि स्पष्ट आवाजात असल्याने हे सर्व मनाला प्रसन्न करणारे आहे. श्री दत्तमंदिरात देवीकवच लावले जाते. ते ऐकायला चांगले वाटते.’
– श्री. विवेक नाईक, प्रियोळ
२. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभ होतो !
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभ होतो. कोरोना महामारीच्या या काळात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आरोग्यविषयक (‘प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यावी’, याविषयी) सुरेख माहिती मिळते. या दैनिकातून देवधर्म आणि सद्गुरु यांच्याविषयीही चांगली माहिती मिळते. मला हे दैनिक वाचून पुष्कळ चांगले अनुभव आले आहेत.’
– श्री. मनोहर आगरवडेकर, शिवोली
३. सनातन प्रभातमध्ये सांगितलेले आत्मसात करून ते आचरणात आणले पाहिजे. – श्री. नरेंद्र रिवणकर, पणजी, गोवा.