मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला संरक्षण पुरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश
तरुणीच्या कुटुंबियांकडून ठार मारण्याची धमकी
|
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मेरठ पोलीस अधीक्षकांना मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला. तिच्या वैवाहिक जीवनात पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच तिचे वडील किंवा कुटुंबांतील व्यक्ती, त्यांचे मित्र अथवा प्रसारमाध्यमांतील लोकांकडून तिला शारीरिक दुखापत करणार नाही, याचीही काळजी घेण्यास सांगितले आहे. न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला पुढील ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.
Allahabad High Court orders protection for woman who converted from Islam to Hindu religion, married as per Hindu rites
report by @Areebuddin14#allahabadhighcourt #religiousfreedom
https://t.co/UQwBtSFSoH— Bar & Bench (@barandbench) May 27, 2021
हिंदु झाल्यानंतर या तरुणीने स्वतःचे ‘यती’ असे नामांतर केले. तिने धर्मांतर केल्यावर जिल्हाधिकार्यांना याची माहिती दिली होती, तसेच वर्तमानपत्रातही याविषयी माहिती प्रसिद्ध केली होती. तिने एप्रिल मासात हिंदु तरुणाशी विवाह केला होता. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडून ठार मारण्याची धमकी मिळू लागल्यावर तिने न्यायालयात धाव घेतली होती.