सौदी अरेबियामध्ये मशिदीवरील भोंग्यांवर बंदी !

मशिदींवरील भोंगे महंमद पैगंबर यांंच्या शिकवणीविरुद्ध असल्याचा सौदी सरकारचा दावा

मुसलमानांसाठी सर्वांत महत्त्वाच्या असणार्‍या सौदी अरेबियामध्ये असा निर्णय घेण्यात येऊ शकतो, तर भारतात का घेतला जाऊ शकत नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाच्या इस्लामविषयांच्या प्रकरणी स्थापन केलेल्या मंत्रालयाचे मंत्री डॉ. अब्दुल्लातिफ बिन अब्दुलअजीज अल-शेख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मशिदींवर जे भोंगे लावले जातात, त्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे. केवळ अजान आणि सामूहिक प्रार्थनेच्या वेळीच अन् केवळ मशिदीपुरताच भोंगा तोही ठराविक आवाजाच्या मर्यादेतच वापरता येणार आहे. याचे उल्लंघन करणार्‍याच्या विरोधात कडक कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. या निर्णयामागे सौदीने महंमद पैगंबरांच्या शिकवणीचा हवाला दिला आहे. त्यामध्ये ‘तुमच्यातील प्रत्येक जण व्यक्तीगत स्वरूपात अल्लाला हाक मारत असतो. नमाजपठण करतांना स्वतःचा आवाज दुसर्‍याच्या आवाजापेक्षा अधिक नसावा, असे महंमद पैगंबराने म्हटले आहे’, असे सौदीने म्हटले आहे.

सौदी सरकारच्या या निर्णयाचे इस्लामी विचारवंतांनी समर्थन केले आहे. भोंग्यांच्या आवाजाने मशिदींच्या जवळ रहाणारे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होता, असेही या विचारवंतांनी म्हटले आहे.