पुणे पोलिसांची विनाकारण फिरणार्या १ लाख जणांवर कारवाई
नियमभंग करणार्यांना आर्थिक दंडासमवेत शिक्षा म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक केल्यास त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
पुणे – पोलिसांनी गेल्या २३ दिवसांत कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्या १ लाख नागरिकांंवर कारवाई केली आहे. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडण्यास अनुमती आहे. पोलीस बाहेर पडणार्यांची चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. कारण योग्य न वाटल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.