गोव्यात ‘ब्लॅक फंगस’ साथीचा रोग म्हणून घोषित
पणजी – कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ रोगाचे प्रमाण वाढत असल्याने गोवा शासनाने २७ मे या दिवशी ‘ब्लॅक फंगस’ हा रोग साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. यामुळे राज्यातील सर्व रुग्णालयांना ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहिती राज्यशासनाला द्यावी लागणार आहे. राज्यशासनाला यामुळे रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील धोरण ठरवण्यास साहाय्य होणार आहे. राज्यात २५ मेपर्यंत ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १० होती.