मिरज ब्राह्मण परिवाराच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मिरज, २८ मे (वार्ता.) – ब्राह्मण परिवाराच्या वतीने गरजू पुरोहित, कष्टकरी कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात करण्यात आले. या वस्तूंसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त सौ. स्मृती पाटील, मिरज येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री. किशोर पटवर्धन, श्री. राजाराम शुक्ल, श्री. विष्णु बेल्लारी, सौ. सायली हिप्परगी यांचे योगदान लाभले. या वेळी ब्राह्मण परिवार मिरजचे प्रमुख श्री. ओंकार शुक्ल, सौ. इरावती पटवर्धन, श्री. श्रेयस गाडगीळ, श्री. अरविंद रूपलग उपस्थित होते.