कामात हलगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करणार ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

शिराळा येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि अन्य

शिराळा (जिल्हा सांगली), २८ मे – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची दाहकता अधिक असून तिची व्यापकताही मोठी आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी महसूल आणि संबधित विभागाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करावे. कोरोनाच्या काळात जनतेमधून तक्रारी येणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात कामात हलगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.