पदोन्नतीतील आरक्षणावर तिन्ही पक्षांची भूमिका वेगवेगळी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
भंडारा येथे म्युकरमायकोसिस उपचारासाठी प्रयत्न करणार !
भंडारा – ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची पदोन्नती आरक्षणाच्या सूत्रावरून वेगवेगळी भूमिका दिसून येत आहे. सरकारची भूमिका नेहमीच दुटप्पीपणाची राहिली आहे. त्यांचा सामाजिक न्याय बोलण्यासाठी वेगळा आहे आणि कृतीमध्ये वेगळा आहे. सत्ताधारी हे सर्व काही ठरवून करतात, एकाने असे वागायचे आणि दुसर्याने तसे वागायचे’, अशी सरकारवर टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २७ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड प्रभागाची पहाणी आणि शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘बाल शिशू केअर युनिट’मध्ये आग लागल्याने यामध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला ५ मास होऊनही रुग्णालयात अग्नी सुरक्षेची (फायर सेफ्टी) व्यवस्था कार्यान्वित केली नसल्यााविषयी फडणवीस यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.
भंडारा येथे ‘म्युकरमायकोसिस’ उपचारासाठी प्रयत्न करणार !
फडणवीस म्हणाले की, ‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांवर शस्त्रकर्म करण्याची सुविधा येथे नसल्याने त्यांना नागपूर येथे पाठवावे लागते. ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर येथेच उपचार आणि शस्त्रकर्म करता यावे, यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सिद्धता केली आहे.