उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा २८ मे या दिवशी सातारा दौरा
प्रशासन आणि आरोग्य विभागाशी महत्त्वपूर्ण बैठक
सातारा – सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे २८ मे या दिवशी सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्यांची प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यासह महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखावर गेला असून प्रतिदिन २ सहस्र कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच ३० हून अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे.