‘म्युकरमायकोसिस’वरील ‘एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शन’चे वितरण ३१ मेपासून चालू होणार !
वर्धा – देशात कोरोनानंतर ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असल्याने त्याच्यावर मिळणार्या ‘एम्फोटेरेसीन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन येथील ‘जेनेटिक लाईफ सायन्स’ या आस्थापनाने ‘एम्फोटेरेसीन-बी’ या इंजेक्शनचे उत्पादन चालू केले आहे. ३१ मेपासून या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे.