फेरीवाल्यांना पूर्वी घोषित केलेले आणि अद्याप न मिळालेले आर्थिक साहाय्य तात्काळ द्यावे !
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मागणी
सातारा – गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती. आता दीड मास उलटूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्या साहाय्याचे काय झाले ? असा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. ‘सध्या दळणवळण बंदी असल्यामुळे हातावर पोट असणार्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचा विचार करून त्यांना तात्काळ आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.