कोरोनाबाधित मित्राच्या पत्नीवर पोलीस मित्राचा अत्याचार
पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर अत्याचार करणारा पोलीस निलंबित
सोलापूर – पोलिसानेच सहकारी पोलीस मित्राच्या पत्नीवर २३ मे या दिवशी बळजोरीने अत्याचार केले आहेत. या प्रकरणी त्या महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संशयीत आरोपी रवी मल्लीकार्जुन भालेकर यास पोलीस सेवेतून निलंबित केले आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील शिपाई भालेकर याने त्याचा एक पोलीस मित्र कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पोलीस मुख्यालयातील रुग्णालयात उपचार घेत होता. या संधीचा अपलाभ घेऊन शिपाई भालेकर याने पोलीस मित्राच्या पत्नीवर अत्याचार केला. (जनतेचे रक्षकच भक्षक झाल्यास सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागायची ? अशा पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)