‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने देवबाग येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा

‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर किनारपट्टी भागात निर्माण झाली आहे पाण्याची समस्या !

‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने पाणीपुरवठा (प्रतिकात्मक चित्र)

सिंधुदुर्ग – ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने २५ मे या दिवशी ५ सहस्र लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून देवबाग गावात पुरवण्यात आले. ‘तौक्ते’ वादळामुळे येथील समुद्राचे पाणी विहिरींमध्ये घुसल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

सामाजिक संघटनांनी साहाय्यासाठी पुढे येण्याचे आवाहन !

तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रकिनार्‍यावरील लोकांची मोठी हानी झाली आहे. शासकीय साहाय्य बर्‍याच जणांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे कोकणातील सामाजिक संघटना, तसेच दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन वादळामुळे हानी झालेल्या आणि आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना साहाय्य करावे, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने या वेळी करण्यात आले. या वेळी अनिश सावंत, प्रतीक कुबल, लकी सावंत, नितीन सोलकर, महेश अडसुळे, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.