सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती
१. कोरोनाचे नवीन रुग्ण ५६१
२. २४ घंट्यांत मृत्यू झालेले रुग्ण ८
३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ६२८
४. उपचार चालू असलेले रुग्ण ४ सहस्र ६३५
५. बरे झालेले रुग्ण १८ सहस्र ५१४
६. आतापर्यंतचे एकूण रुग्ण २३ सहस्र ७८३
दोडामार्ग येथे ‘रॅपिड टेस्ट’मध्ये एकाला कोरोना असल्याचे निष्पन्न
दोडामार्ग – दोडामार्ग बाजारपेठेत २६ मे या दिवशी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी पोलीस आणि आरोग्यपथक यांच्यासह अचानक तपासणी चालू केली. यामध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले, तसेच वेळेचे निर्बंध न पाळणार्या ४ दुकानांवर कारवाई करण्यात आली.
मालवण शहरात होणार ऑक्सिजन खाटा असलेले कोविड केअर सेंटर
मालवण – मालवण ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या नगरपालिकेच्या भूमीत लवकरच २० ऑक्सिजन खाटांची सोय असलेले कोविड केअर सेंटर सिद्ध केले जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि बालाजी पाटील यांच्यासह नगरपालिकेच्या भूमीची पहाणी केली. या कोविड केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन खाटांसह ५० ऑक्सिजन सिलिंडर आणि १० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.