मास्क परिधान करण्यास सांगितल्यावर रशियाच्या महिला पर्यटकाने कांदोळी येथील सूपरमार्केटचा बिलिंग काऊंटर तोडला
पणजी – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आणि मृत्यूदर अल्प होत नसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांदोळी येथील लवंदे सूपर मार्केटमध्ये प्रवेश करणार्या एका रशियन महिला पर्यटकाला बिलिंग काऊंटरवर असलेल्या युवतीने सूपरमार्केटमध्ये प्रवेश करतांना मास्क घालण्यास सांगितल्यावर रशियाच्या महिलेने बाचाबाची करण्यास प्रारंभ केला आणि रागाने बिलिंग काऊंटर तोडला, तसेच संगणकही खाली टाकले. कोरगाव येथे काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे एका पर्यटकाला मास्क घालण्यास सांगितल्यावर संबंधित पर्यटकाने मास्क न घालता ‘तुमची नियमावली (प्रोटोकोल) दाखवा’, असे उर्मटपणे पोलिसांना सांगितले.