गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ४८७ नवीन रुग्ण
पणजी – गोव्यात २६ मे या दिवशी ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २ सहस्र ४९९ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र ६१५ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ४८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३२.२२ टक्के आहे. दिवसभरात १ सहस्र ३६३ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १३४ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढून १५ सहस्र ७९१ झाली आहे. गोव्यात सध्या मडगाव येथे सर्वाधिक १ सहस्र ५०२ रुग्ण आहेत.