संचारबंदी असूनही ख्रिस्त्यांच्या एका गटाकडून वास्को परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वाटप
सडा, वास्को येथील नागरिकांनी ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वाटप करणार्या गटाला हाकलून लावले !
आपत्काळात धर्मप्रसार करून ख्रिस्ती नेहमी अडलेल्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतात, हे या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध झाले. याविषयी अंनिसवाले आणि तथाकथित सेक्युलरवाले काही बोलत नाहीत, हे जाणा ! ते कुठे भेटल्यास त्यांना याविषयी नक्की विचारा !
वास्को, २६ मे (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीतही ख्रिस्त्यांच्या एका गटाकडून वास्को परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘हिलिंग प्रेयर्स’ (प्रार्थना)च्या पत्रकांचे वाटप करण्याचा संतापजनक प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे एक मासापूर्वी हा प्रकार सडा-वास्को येथे घडला आणि यामुळे काही स्थानिकांनी त्यांना तेथून हाकलून लावले; मात्र हा प्रकार वास्को परिसरात अन्य ठिकाणी चालू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धार्मिक कलह निर्माण करणारा हा प्रकार पोलीस आणि शासन यांनी हाणून पाडावा, अशी मागणी होत आहे.
सुमारे एक मासापूर्वी सडा-वास्को येथे काही महिला आणि शाळेत जाणार्या विद्यार्थी यांचा एक गट आला. हा गट कोरोनापासून बरे होण्यासाठी प्रार्थना असलेली (हिलिंग प्रेयर्स) हस्तपत्रके वितरित करू लागला. या गटात बायणा आणि झुआरीनगर येथील एका समुदायातील महिलांचा समावेश होता. या महिला कोकणी भाषा चांगल्या रितीने बोलत असल्याने या महिला गोव्याच्याच आहेत, असे स्थानिकांना वाटत होते. ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वितरण हा धर्मांतराचा प्रकार असल्याचे सडा-वास्को येथील काही स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांना तेथून हाकलून लावण्यात आले; मात्र संचारबंदीचा अपलाभ उठवून हा महिलांचा गट वास्को परिसरात अन्य ठिकाणी कोरोना बरा होण्यासाठी ‘हिलिंग प्रेयर्स’च्या पत्रकांचे वितरण करू शकतात आणि यामुळे समाजात धार्मिक कलह निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकाराला पोलिसांना त्वरित आळा घालण्याची मागणी होत आहे.