श्रीलंकेतील ‘कोलंबो पोर्ट सिटी’ बनवण्याचे कंत्राट चीनकडे !
कोलंबो – चीनमधील एका आस्थापनाला शहरात नवीन बंदर शहर (पोर्ट सिटी) बनवण्याचे कंत्राट मिळाले आहे. संसदेत याविषयीचे विधेयक संमत करण्यात आले. विरोधी पक्षाने याला विरोध केला होता; मात्र बहुमताच्या जोरावर सरकारने हे विधेयक संमत केले. येथील सर्वोच्च न्यायालयानेही यावर जनमत चाचणी घेण्याचा सल्ला दिला होता; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. या शहरात जाण्यासाठी एक स्वतंत्र पारपत्र असणार असल्याचे म्हटले जात आहे. (चीन श्रीलंकेचा भूभाग गिळंकृत करायला निघाला आहे, याचा पुरावा ! – संपादक)