नागपूर येथे बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
नागपूर – ‘कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेता शहरात बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुसज्ज ठेवावे’, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २५ मे या दिवशी महापालिकेला केली. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’द्वारे साहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी त्यांनी काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिसच्या) स्थितीचा आढावाही घेतला.
Chaired a meeting with Nagpur Municipal Corporation @ngpnmc officials, Mayor, public representatives at NMC office.
Took a detailed review on steps taken for #Mucormycosis & measures in view of the probability of third wave.#NagpurFightsCorona#MaharashtraFightsCorona pic.twitter.com/dDCv1nmyRI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 25, 2021
त्यांनी महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन कोरोनाच्या तिसर्या लाटेवरील उपाययोजनांविषयी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘रुग्णालय उभारतांना सर्व वयोगट विचारात घ्यावेत. पालकांची व्यवस्था करावी. ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांचे ‘स्क्रिनिंग’ लवकर होऊन वेळेत उपचार होण्यासाठी ६ विधानसभा मतदारसंघात पडताळणी शिबीर घ्यावे. महापालिकेच्या ५ रुग्णालयांत व्यवस्था करावी.’’