कोरोनाकाळात मन:शांतीसाठी भगवद्गीतेचे वाचन करावे ! – हरिदत्त जाधव, सामाजिक कार्यकर्ते
सातारा, २६ मे (वार्ता.) – सद्यस्थितीमध्ये समाजाने आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत रहाण्याची आवश्यकता आहे. कोरोनाकाळात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. गीता वाचन हा मन:शांतीसाठी सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे गीता ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिदत्त जाधव यांनी केले.
खटाव तालुक्यातील निढळ या गावी नुकताच अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या निमित्ताने कोरोनाचे नियम पाळत निढळ गावचे सुपुत्र हरिदत्त सुभाष जाधव यांनी ५० भाविकांना भगवद्गीता ग्रंथ भेट दिला. हरिदत्त जाधव हे पुणे येथील इन्फोसिस आस्थापनामध्ये उच्चपदस्थ आहेत. विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन जीवन जगणार्या आणि इतरांनाही प्रोत्साहन देणार्या हरिदत्त जाधव यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.