नाशिक येथे खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन !
नाशिक – येथील सिन्नर भागातील एका खासगी रुग्णालयाने कोरोनाबाधितावर उपचार करतांना अव्वाच्या सव्वा दराने रक्कम आकारली. तसेच रुग्णाची अनामत रक्कम देण्यास रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करत होते. यामुळे रुग्णालयाच्या विरोधात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना समवेत घेऊन रुग्णालयामध्ये अर्धनग्न आंदोलन केले. पोलिसांनी भावे यांना कह्यात घेऊन काही घंट्यांनी सोडून दिले. भावे यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
’10 लाख रुपये घेतले, घरातील चार माणसे कोरोनाने गेली’, नाशिकमध्ये खासगी हॉस्पिटलच्या लुटीविरोधात आप नेत्याचे ‘अर्धनग्न’ आंदोलन. (Video भाग 1)#Nashik #coronavirusindia @OfficeofUT @rajeshtope11 @Devendra_Office @AamAadmiPartyhttps://t.co/CbvSFUB0GJ pic.twitter.com/7dNhhz2XaR
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2021