बेलारूसमधील हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पत्रकाराला अटक !

रोमन प्रोतासेविच

मिन्स्क (बेलारूस) – पूर्व युरोपीय देश बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये नुकत्याच एका २६ वर्षीय पत्रकाराला अटक करण्यात आली. रोमन प्रोतासेविच असे त्यांचे नाव असून गेल्या ऑगस्टमध्ये बेलारूसमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्याने राष्ट्राध्यक्ष अलेक्सझँडर लुकाशेन्को यांच्या विरोधात जनचळवळ उभारली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

ते ग्रीसमधून लिथुएनिया येथे विमानातून प्रवास करत असतांना बेलारूसच्या हवाई क्षेत्रात एका लढाऊ विमानाने त्या विमानास घेरले आणि मिन्स्क येथे उतरण्यास भाग पाडले. त्यात बॉम्ब असल्याचे सांगून ही कारवाई करण्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले असले, तरी विमान उतरल्यावर प्रोतासेविच आणि त्यांची प्रेयसी यांना अटक करण्यात आली. याचा युरोपीय देशांनी निषेध केला आहे.