नोकरीत आरक्षण दिल्यावर पदोन्नतीत आरक्षण देऊ नये ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख
मुंबई – गुणवत्तेला न्यून लेखणे, हे राष्ट्राच्या विकासासाठी योग्य नाही. प्रशासकीय सेवेत गुणवत्ता असेल, तरच विकासाची गंगा राज्यात येईल. त्यामुळे नोकरीत आरक्षण दिल्यावर पदोन्नतीत आरक्षण देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पदोन्नतीमध्ये आरक्षण दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची चेतावणी सेंगर यांनी दिली आहे.
या पत्रात अजय सिंह सेंगर यांनी लिहिले आहे की, जातीवर आधारित विषमतानामक कीड नष्ट करणे, ही काळाची आवश्यकता आहे. प्रत्येक जातीसाठी वेगवेगळा न्याय आणि कायदा प्रणाली भविष्यात यादवी (गृहयुद्ध) निर्माण करू शकते. जगातील जेवढी विकसित राष्टे्र आहेत, त्यांनी ‘गुणवत्ता’ हाच निकष स्वीकार केला आहे. त्यामुळे त्यांची पुष्कळ प्रगती झाली.’’