२८ मे या दिवशी होणारा स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त मेळावा आणि पुरस्कार सोहळा स्थगित
सातारा, २६ मे (वार्ता.) – हिंदुमहासभेच्या वतीने प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त मेळावा आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो; मात्र यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २८ मे रोजी होणारा हा मेळावा आणि सोहळा स्थगित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम योग्य वेळी करण्यात येईल, अशी माहिती हिंदुमहासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दत्ताजी सणस यांनी दिली.
अधिवक्ता दत्ता सणस पुढे म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे कोणताही प्रकट कार्यक्रम होणार नाही; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर भक्तांनी २८ मे या दिवशी आपल्या घरी सावरकर जयंती साजरी करावी. तसेच स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केल्याची छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रीकरण ९८२२८ ०१९७३ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत.