सांगली जिल्ह्यातील संभाजी गुरव यांनी ‘एव्हरेस्ट’ शिखर पार केले !
सांगली – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथील संभाजी गुरव यांनी जगातील सर्वात उंच असलेले ‘एव्हरेस्ट’ शिखर २२ मे या दिवशी पार केले. संभाजी गुरव हे मुंबई पोलीस दलात साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
Maharashtra: On Everest top, cop holds Tricolour https://t.co/hPlcHJAMk6
— TOI Mumbai (@TOIMumbai) May 25, 2021
‘एव्हरेस्ट’ शिखर पार करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील गुरव हे तिसरे कर्मचारी आहेत. ‘एव्हरेस्ट’ पार करण्यासाठी गुरव दोन वर्षांपासून परीश्रम घेत होते. वातावरण आणि निसर्गाने साथ दिल्याने गुरव एव्हरेस्ट शिखर पार करू शकले.