सक्रिय रुग्ण संख्या कमी होत असल्याने पिंपरी-चिंचवड येथील ५ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद
पिंपरी-चिंचवड – येथील ५ कोविड केअर सेंटर महानगरपालिकेने बंद केली आहेत. या कोविड केअर सेंटरची एकूण १ सहस्र बेडची क्षमता आहे. या कोविड सेंटरमध्ये बर्याच दिवसांपासून एकही रुग्ण नव्हता, तसेच या भागात मे मासात सक्रिय रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणूनच आम्ही त्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरी प्रशासनाने कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद केले आहेत आणि आवश्यक असल्यास ते पुन्हा चालू केले जातील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले. विभागीय अधिकार्यांना शासन आणि नागरी कर्मचारी यांच्या लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.