पुणे येथील पालखी सोहळ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा बैठक
पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी पालखी सोहळा रहित करण्यात आला होता. यंदा पालखी सोहळा रहित होणार कि नाही ? पालखी सोहळ्याचे स्वरूप काय असेल ? यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे २८ मे या दिवशी बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
प्रतिवर्षी नेमाने पालखी आळंदी आणि देहूमधून पंढरपूरकडे रवाना होते. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. भजन, कीर्तन, नामस्मरण, टाळ-मृदंगाच्या गजराने पालखी सोहळ्यात भावपूर्ण वातावरण सिद्ध होत असते.