हिंदु मुलीला फूस लावून तिच्याशी लग्न करण्याचा धर्मांधाचा डाव बजरंग दलाच्या जागरूकतेमुळे फसला !
असे प्रकार रोखण्यासाठी सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा का करत नाही ?
उन्नाव (उत्तरप्रदेश) – येथील एका २२ वर्षीय हिंदु मुलीला फूस लावून तिच्याशी ‘कोर्ट मॅरेज’ करण्याचा एका २६ वर्षीय धर्मांधाचा डाव बजरंग दलाच्या जागरूकतेमुळे फसला. धर्मांधाने पीडित मुलीच्या घरच्या लोकांना अंधारात ठेवून तिच्याशी लग्न करण्याचा घाट घातला होता. यासाठी त्याने कागदपत्रांचीही सिद्धता केली. याची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांधाला गाठून त्याला जाब विचारला. या वेळी कार्यकर्ते आणि धर्मांध युवक यांच्यात झटापटीही झाली. घटनास्थळी युवकाची आईदेखील उपस्थित होती. तिने आराडाओरडा केल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले आणि धर्मांध युवक आणि हिंदु युवती यांना महिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे युवतीनेही सदर धर्मांध युवकाने तिला फूस लावून आणल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी युवतीच्या मामाने सदर धर्मांध युवकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.