नियमित व्यायाम, योगासने आणि प्राणायाम केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते ! – डॉ. भूपेश शर्मा, वैद्यकीय तज्ञ, हरियाणा
कोरोनाच्या महामारीत आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदातील सूत्रांचा दिनचर्येत योग्य प्रकारे अवलंब केल्यास शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी उपाय केल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता अन् मनुष्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास साहाय्य होते. कोरोनामुळे होणारी प्राणघातक परिस्थिती पालटण्यासाठी खाण्यामधून जाणारी विषारी तत्त्वे रोखली पाहिजेत. अंघोळीच्या अगोदर सर्वांगाला तेल (अभ्यंग करावे) लावावे. यामुळे फुप्फुसांमधील रुक्षता न्यून होण्यास साहाय्य होते. तसेच जेवणामध्ये नियमित शुद्ध तूप आणि तेल यांचा समावेश करावा. यामुळे वायूतत्त्व संतुलनात राहून शरिरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित रहाते.