काळ्या बुरशीचा आजार संसर्गामुळे पसरत नाही ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी देहली – काळ्या बुरशीचा (‘म्युकरमायकोसिस’चा) आजार संसर्गामुळे पसरत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रोगप्रतिकारशक्तीच्या अभावामुळे काळ्या बुरशीचा आजार होतो आणि त्याचा परिणाम मेंदूपर्यंत, तसेच लहान आतड्यांमध्येही होतो. या बुरशीला वेगवेगळ्या रंगाची ओळख देणे अयोग्य आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.