सनातनचे १०७ वे संत पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर अयोध्येतील त्यांचे मित्र आणि परिचित मान्यवर यांच्याकडून प्राप्त झालेले भावपूर्ण संदेश !
‘माझे वडील पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या आचरणामुळे अनेक जण प्रभावित व्हायचे. त्यांना भेटणारे वृद्ध, तरुण किंवा लहान मुले सर्वजण त्यांचा आदर करायचे. सर्वांना वडिलांचा आधार वाटायचा. सर्वांसाठी ते वंदनीय होते. त्यांच्या देहत्यागाची वार्ता कळल्यावर त्यांचे मित्र, परिचित व्यक्ती आदी अनेकांनी आपले दुःख प्रकट केले. पुढे काही निवडक संदेश दिले आहेत.’ – सौ. क्षिप्रा जुवेकर
१. डॉ. अभय सिंह, प्रधानाचार्य, साकेत डिग्री महाविद्यालय.
१ अ. डॉ. नंदकिशोर यांच्या मृत्यूने कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे ! : आमचे महनीय गुरु, विभागातील सहयोगी, माजी (पूर्व) विभागाध्यक्ष, ‘सैन्य विज्ञान’ या विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवलेले नंदकिशोर यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे आकस्मिक निधन झाले. मी एकदम निःशब्द आणि स्तब्ध झालो आहे. ‘त्यांचे अशा प्रकारे जाणे’, ही माझी व्यक्तीगत हानी असून ही कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दारुण दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो ! ॐ शांती !
२. श्री. आर्.पी. तिवारी, सेंट्रल बँक
२ अ. अविश्वसनीय वृत्त : आताच डॉ. अभय सिंह यांनी ‘फेसबूक’वरून हे अविश्वसनीय वृत्त दिले. हे ईश्वरा, हे काय झाले ? देवाने माझ्या अभिन्न मित्राला आमच्यापासून दूर नेऊन त्याच्या जवळ घेतले. त्यांना सद्गती प्रदान कर.
३. श्री. अजयकुमार पांडे, सैन्य विज्ञान विभाग, साकेत महाविद्यालय.
३ अ. डॉ. नंदकिशोरजी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात ! : आमचे माजी (पूर्व) विभागाध्यक्ष डॉ. नंदकिशोरजी यांच्या आकस्मिक निधनाने माझी व्यक्तीगत हानी झाली आहे. मी एकदम तुटून गेलो आहे. ते नेहमी मला समजून घ्यायचे. एवढे प्रेम मला आजपर्यंत कुणाकडून मिळाले नव्हते. मी एकटाच असतांनासुद्धा ते मला नेहमी ज्ञान देत असत. ते नेहमी एका पालकाच्या रूपात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात. त्यांच्या प्रदीर्घ आजारपणामुळे गेल्या २ – ३ मासांपासून माझे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. ‘ते आता आपल्यात नाहीत’, यावर माझा विश्वासच बसत नाही. मी आणि माझे पूर्ण कुटुंबीय त्यांना श्रद्धांजलीपुष्प अर्पित करतो. या दुःखसमयी भगवंत त्यांच्या कुटुंबियांना सर्व सहन करण्याची शक्ती देवो.
४. डॉ. हर्ष कुलश्रेष्ठ, पूर्व अधिकारी, भारत सरकार
४ अ. आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्याला गमावले ! : पुष्कळ दुःखद वृत्त समजले. आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्याला गमावले आहे. ‘भगवंता, हे संकट सहन करण्याची शक्ती तू सर्वांना दे. ‘त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान होऊ दे’, अशी ईश्वराला प्रार्थना आहे. विनम्र श्रद्धांजली ! ॐ शांती ॐ !
५. श्री. विधिपूजन पांडे, पुरोहित, सनातन संस्थेचे हितचिंतक
५ अ. डॉ. नंदकिशोर आम्हा सगळ्यांना एकटे सोडून निघून गेले. ते आम्हाला (येणार्या) हिंदु राष्ट्राच्या मार्गावर सोडून निघून गेले आहेत.