‘उजनी धरणा’च्या पाण्यावरून पंढरपूर येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन

आंदोलकांनी महामार्गावर पेटवले टायर

आंदोलकांनी महामार्गावर पेटवले टायर

सोलापूर – उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय अधिकृतरित्या रहित करावा, या मागणीसाठी उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २४ मे या दिवशी उपरी (तालुका पंढरपूर) येथे पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.

सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरसाठी संमत केलेले ५ टी.एम्.सी. पाणी त्वरित रहित करून तसा शासन आदेश काढावा, या मागणीसाठी २४ मे पासून पंढरपूर येथे या आंदोलनाचा प्रारंभ झाला. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, तसेच दीपक वाडदेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आंदोलन चालू केले आहे. इंदापूरसाठी संमत केलेले पाणी रहित करावे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, अशी चेतावणीही सचिव माऊली हळणकर यांनी या वेळी दिली.