गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ४२ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ६२१ नवीन रुग्ण
पणजी – गोव्यात २३ मे या दिवशी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र ३८३ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र ५६८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ६२१ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३५.४८ टक्के आहे. दिवसभरात २ सहस्र ५४५ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १४५ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून १७ सहस्र २७७ झाली आहे.