शिवसेनेकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
शिवसेनेकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ५० लाख रुपयांचे ‘व्हेंटिलेटर’ प्रदान
कोल्हापूर – कोरोना महामारीचे संकट राज्यावर घोंगावत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ५० लाख रुपयांचे ‘व्हेंटिलेटर’ प्रदान करण्यात येत आहेत. शिवसेनेकडून रुग्णालयातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य असेल, असे मत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. श्री. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास ‘व्हेंटिलेटर’ प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, युवा नेते श्री. ऋतुराज क्षीरसागर, सर्वश्री किशोर घाटगे, नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, जयवंत हारुगले यांसह अन्य उपस्थित होते.