दळणवळण बंदीच्या काळात पुणे येथील ७ मंदिरांमध्ये चोरी
भाविकांनी भक्तीभावाने आणि श्रद्धापूर्वक अर्पण केलेले धन अगदी सहजरित्या चोरट्यांच्या खिशात जाते, हे संतापजनक नाही का ? प्रत्येक हिंदू खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही.
पुणे, २३ मे – दळणवळण बंदीच्या काळात पुणे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांतील दानपेट्यांमधून चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. मागील काही दिवसांत विश्रामबाग, फरासखाना, समर्थ, खडकी या पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील मंदिरांतून दानपेट्या फोडून रक्कम चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत ७ मंदिरे आणि एका चर्चमधील दानपेटी चोरून नेल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.
पुण्यातील श्री शारदा गणपति मंदिर, गणेश पेठेत असलेल्या डुल्या मारूति देवस्थान मंदिरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, नाना पेठेतील शितळादेवी मंदिर अशा शहरातील विविध भागांतील मंदिरातून दागिने, रोख रक्कम, तसेच दानपेटी चोरीला जाण्याचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे.
दळणवळण बंदीमध्ये कामधंदा मिळत नसल्यामुळे चोरांकडून मंदिरांतील दानपेट्या फोडल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (असे म्हणून पोलीस स्वतःचे दायित्व झटकत आहेत. स्वत:ची निष्क्रीयता झाकण्यासाठी कारणे देणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था कधी राखू शकतील का ? येथे हिंदूंची मंदिरे आहेत म्हणून पोलीस अशी कारणे देत आहेत, अन्य धर्मियांच्या संदर्भात पोलिसांनी चोरांना शोधूनही दिले असते ! – संपादक)