येत्या २ दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन १० वीच्या परीक्षेविषयी सविस्तर चर्चा करणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई – इयत्ता १० वीच्या परीक्षेविषयी मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्रशासनाची भूमिका यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी २४ मे या दिवशी सविस्तर चर्चा होणार आहे. या वेळी न्यायालयाने उपस्थित केलेल्या सूत्रांविषयी सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ मे या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘‘ही परिस्थिती असाधारण आहे. कोरोनाची दुसरी लाट अल्प असेल, असे वाटले होते; पण कोरोनाचा धोका वाढला. दुसर्या आणि तिसर्या लाटेत मुलांवर परिणाम व्हायला लागला आहे. आम्ही न्यायालयापुढे आमचे म्हणणे मांडू. न्यायालय याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री आहे.’’