हिंदूंचे राष्ट्रपुरुष : हिंदवी साम्राज्यविस्तारक थोरले बाजीराव पेशवे !
२४ मे २०२१ या दिवशी ‘थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिन’ आहे. त्यानिमित्ताने…
वयाच्या केवळ विसाव्या वर्षी पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यावर बाजीरावांनी निजाम, इंग्रज, सिद्दी, मोगल आदी हिंदु राष्ट्राच्या शत्रूंवर वचक बसवला. २० वर्षांच्या सत्ताकाळात रणधुरंधर बाजीरावांनी २१ मोठ्या लढाया केल्या. यांपैकी एकही लढाई ते हरले नाहीत ! वर्ष १७३९ मध्ये इराणच्या नादिरशहाने देहलीवर आक्रमण केले. त्याचे पारिपत्य करण्यास बाजीराव सैन्यासह निघाले. हे कळताच नादिरशहा पळून गेला. हिंदू येत आहेत, हे कळल्यावर वायव्येकडून आलेला आक्रमक पळून जाण्याची ही पहिलीच वेळ ! बाजीरावांनी देहलीपर्यंत दिलेल्या धडकेने घाबरून जाऊन मोगल बादशहाने काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रे मुक्त केली.
(‘मुळावरच घाव घातला की, फांद्या आपोआप खाली येतात’, हे बाजीरावांचे तत्त्व आजही समोर ठेवून राष्ट्रासमोरील आतंकवादासारख्या समस्या सोडवायला हव्यात ! – संपादक)