गायींना बेशुद्ध करणारे इंजेक्शन देऊन त्यांना कत्तलीसाठी पाठवणार्या धर्मांध मुलाला अटक
धर्मांधांची लहान मुलेही कशा प्रकारे गोहत्या करण्यासाठी धर्मांधांना साहाय्य करतात, हे लक्षात येते. अशी मुले मोठी झाल्यावर किती प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया करतील, याचा विचारही न केलेला बरा !
नवी दिल्ली – जेजेनगर कॉलनीतील बवाना भागातील सलमान नावाच्या मुलाला देहली पोलिसांनी अटक केली. तो गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत असे आणि इतर धर्मांधांना त्या गायींना कत्तलीसाठी घेऊन जाण्यास सांगत असे. गोरक्षकांनी त्याला पकडून पोलिसांकडे दिले, तर दुसरा अरमान नामक धर्मांध घटनास्थळावरून पळून गेला.
देहलीच्या बाहेरील भागात, तसेच हरियाणा, देहली आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथे गुरांना चरण्यासाठी मोठे भूभाग उपलब्ध आहेत. सामान्यत: गुराखी जनावरांना तेथे चरण्यासाठी येते. मागील काही दिवस त्यांना अज्ञात कारणास्तव गुरांची संख्या अल्प होत असल्याचे आढळले. याचे कारण समजण्यासाठी त्यांनी गोरक्षकांना गायींवर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्या वेळी काही धर्मांध मुले गायींना बेशुद्ध करण्यासाठी भूल देणारी इंजेक्शन देत असल्याचे आढळून आले. ही धर्मांध मुले गायींना इंजेक्शन देण्यासाठी एकांत असणार्या काही जागा निवडत. त्यांना भूल दिल्यावर याविषयी ते याविषयी अन्य धर्मांधांना कळवत. हे धर्मांध नंतर रात्रीच्या अंधारात बेशुद्ध गायींना कत्तलीसाठी नेत असत. इंजेक्शन देण्यासाठी या मुलांना ७०० ते १ सहस्र रुपये दिले जात असत. त्यांना औषध भरलेल्या इंजेक्शन सिरिंजदेखील देण्यात येत.