सांगली जिल्हा परिषदेतील लिपिक अरुण कुशिरे यांना २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
भ्रष्टाचारग्रस्त भारत !
सांगली – जिल्हा परिषदेतील लिपिक अरुण योगीनाथ कुशिरे यांना २१ मे या दिवशी अनामत रक्कम परत करण्याच्या मोबदल्यासाठी लाच घेतांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बांधकाम विभागात सापळा रचून ही कारवाई केली.
तक्रारदार बांधकाम ठेकेदार असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाद्वारे त्यांनी केलेल्या कामाचे देयक प्रलंबित होते. या कामासाठी विभागाने भरून घेतलेली अनामत रक्कमही त्यांना मिळालेली नव्हती. त्यासाठी तक्रारदाराकडे कुशिरे याने ३५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केल्यानंतर बांधकाम विभागात सापळा रचून कुशिरे यांना २५ सहस्र रुपये लाच घेतांना पकडण्यात आले, अशी माहिती विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.