लोकांनी थुंकू नये म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या चित्रांवर हिंदुत्वनिष्ठांनी पांढरा रंग दिला !
हिंदु देवतांची विटंबना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे श्री. अमोल चेंडके अन् श्री. राजू कोपार्डे यांचे अभिनंदन !
निपाणी (कर्नाटक) – येथील एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये; म्हणून हिंदु देवतांची चित्रे तसेच हिंदु प्रतिके रेखाटण्यात आली होती. यामुळे देवतांची विटंबना होऊन समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे चित्रे आणि प्रतिके काढून टाकण्यासाठी श्रीराम सेना आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने इमारतीच्या मालकांना निवेदन देऊन यशस्वी प्रबोधन करण्यात आले.
निवेदन स्वीकारल्यावर सदर चित्रे आणि प्रतिके टाकून टाकण्याचे मान्य केले; पण काही कारणास्तव अनेक दिवस त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर हिंदुत्वनिष्ठ श्री. अमोल चेंडके आणि श्रीराम सेना, कर्नाटकचे निपाणी तालुकाप्रमुख श्री. राजू कोपार्डे यांनी त्या इमारत मालकांची अनुमती घेऊन २१ मे या दिवशी या प्रतिमांना पांढरा रंग देऊन विटंबना थांबवली.