भारतातील आत्महत्यांची संख्या चिंताजनक !
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यू.एच्.ओ.) प्रतिवर्षी जगभरात ८ लाख व्यक्ती आत्महत्या करतात. जगातील ७९ टक्के आत्महत्या या अल्प किंवा मध्यम उत्पन्न असणार्या देशांमध्ये होतात. भारतामध्ये गेल्या ५० वर्षांत आत्महत्यांमध्ये दीड पटींनी वाढ झाली आहे. भारतात ८ व्यक्तींमागे एक जण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार भारतात प्रतिवर्षी अनुमाने २ लाख लोक आत्महत्या करतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार प्रतिवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढत आहे. आतंकवादी आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपेक्षा ही संख्या कितीतरी अधिक आहे. जगभरातील वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या विरोधीदिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारतातील आत्महत्यांची आकडेवारी
वर्ष संख्या
- १९६७ ३८ सहस्र ८२९
- २००६ १ लाख १८ सहस्र ११२
- २०११ १ लाख ३५ सहस्र ५८५
- २०१२ १ लाख ३५ सहस्र ४४५
- २०१३ १ लाख ३४ सहस्र ७९९
- २०१९ १ लाख ३९ सहस्र १२३
‘नॅशनल क्राईम ब्युरो’च्या आकडेवारीनुसार मुंबईतील आत्महत्यांच्या घटनांमध्ये ७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात १५ ते २९ वर्षे वयोगटांतील व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.’ |