कोरोनामुळे होणार्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट ! – जागतिक आरोग्य संघटना
नवी देहली – वर्ष २०२० मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत अल्प दाखवली जात आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. या संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जगभरात ८ कोटी २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती, तर १८ लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला होता; मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही संख्या दिलेल्या आकडेवारीपेक्षा पुष्कळ अधिक आहे.
Real COVID-19 death toll could be ‘two to three’ times above official stats: WHO https://t.co/SU1uIbBEIs pic.twitter.com/bAFjfTEBX7
— Reuters India (@ReutersIndia) May 21, 2021