तौक्ते चक्रीवादळामुळे गोवा राज्याची १४६ कोटींची हानी ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, २१ मे (वार्ता.)- तौक्ते चक्रीवादळामुळे गोवा राज्याची १४६ कोटी रुपयांची हानी झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘गोव्यात वर्ष १९९४ पासून आतापयर्र्ंत अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती ओढवली नव्हती. लोकांना वीज आणि पाणी यांविना ३ दिवसांहून अधिक काळ रहावे लागले. पुष्कळ लोकांनी झाडे पडून बंद झालेले रस्ते मोकळे करण्यात शासनाला साहाय्य केले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने इतर राज्यांतून माणसे आणावी लागली.’’