फोंडा तालुक्यातील विविध मंदिर समित्यांकडून शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फोंडा उपजिल्हा रुग्णालय यांना वैद्यकीय उपकरणांचे साहाय्य
फोंडा, २१ मे (वार्ता.)- कोरोनाच्या वाढत असलेल्या संसर्गामुळे राज्यात विविध वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, हे लक्षात घेऊन फोंंडा तालुक्यातील काही मंदिर समित्यांनी शासनाला साहाय्य केले आहे. श्री कामाक्षी संस्थान, शिरोडा; श्री महालसा देवस्थान, म्हार्दोळ आणि श्री विजयादुर्गा देवस्थान, केरी या मंदिरांच्या समित्यांनी शासकीय आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणे, तसेच वैद्यकीय संच देऊन साहाय्य केले आहे. शिरोडा येथील श्री कामाक्षी संस्थानने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १५० ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर देणगी स्वरुपात दिले आहेत. केरी येथील श्री विजयादुर्गा देवस्थानने ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर असलेले संच फोंडा उपजिल्हा रुग्णालयाला देणगी स्वरुपात दिले आहेत, तसेच म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानने ईसीजी मशीन, लॅपटॉप आणि २ केव्हीए इर्न्व्हटर फोंडा उपजिल्हा रुग्णालयाला देणगी स्वरुपात दिले आहेत.