‘दक्षिण मुंबई कॅटरिंग असोशिएशन’कडून ‘२ घास पोटासाठी’ उपक्रमाद्वारे अन्नवाटप !
प्रतिदिन २०० हून अधिकांना लाभ
मुंबई – कोरोनाच्या कालावधीत हातावर पोट असणारे नागरिक उपाशी राहू नयेत, यासाठी ‘दक्षिण मुंबई कॅटरिंग असोशिएशन’ या संस्थेच्या वतीने काळाचौकी आणि शिवडी येथील कामगार विभागात ‘दोन घास पोटासाठी’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे संस्थेकडून अन्नवाटप शिबिरे घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रतिदिन २०० हून अधिक नागरिकांना अन्नवाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमाचा प्रतिसाद पहाता भविष्यात मुंबईतील अनेक विभागांत अशी शिबिरे आयोजित करण्याचा मानस ‘दक्षिण मुंबई कॅटरिंग असोशिएशन’ या संस्थेचे प्रमुख कार्यवाह नितीन कोलगे यांनी व्यक्त केला आहे. या शिबिरांच्या आयोजनासाठी उदय पवार, राजेंद्र साळसकर, संतोष शेट्ये, फतेहसिंह गुजर, संतोष नरे, सचिन नरे, सुनील सावंत, सागर सोहनी, संतोष आडविलकर, विनायक मुंज, संतोष कोटकर, संतोष चौघुले, दीपक घाडीगावकर आदींनी परिश्रम घेतले. अनेक मान्यवरांनी संस्थेच्या या कार्याविषयी कौतुक केले असल्याचे कोलगे यांनी सांगितले.