यवतमाळ जिल्ह्यात दळणवळण बंदीमुळे शेतकर्यांच्या फळबागातील शेतमाल घेण्यास व्यापार्यांचा नकार !
यवतमाळ, २१ मे (वार्ता.) – कडक निर्बंध आणि राज्यातील दळणवळण बंदी यांमुळे शेतकर्यांच्या फळबागातील काढणीस आलेला शेतमाल व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने खराब होत आहे. यातूनच पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथील श्रीकृष्ण देशट्टीवार या फळउत्पादक शेतकर्याची ४ लक्ष रुपयांची हानी झाली. त्यामुळे त्याने शेतातील केळी पिकांना काढून पेटवून दिले. याच भागातील साधारण ४० एकर क्षेत्रावर शेतकर्यांनी टरबूजची लागवड केली; मात्र त्यालाही व्यापारी घेण्यास सिद्ध नसल्याने टरबूज शेतात सडून जात आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.